Astrology : तुमचं पण जमत नाहीये लग्न? मग अंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट टाकाच! होईल चमत्कार

रोहिणी ठोंबरे

• 05:55 PM • 17 Nov 2024

Astrology Marriage : लग्न करायची इच्छा आहे पण जमताना सारखे अडथळे येत आहेत?, गोष्टी सतत बिघडत आहेत... म्हणजे याचा अर्थ तुमचे ग्रह कमजोर आहेत. पण चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही त्यात सुधारणा करू शकता.

Mumbaitak
follow google news

Astrology Marriage : लग्न करायची इच्छा आहे पण जमताना सारखे अडथळे येत आहेत?, गोष्टी सतत बिघडत आहेत... म्हणजे याचा अर्थ तुमचे ग्रह कमजोर आहेत. पण चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही त्यात सुधारणा करू शकता. यासाठी तुम्हाला विस्तृत पूजाविधी करण्याची गरज नाही. खरं तर, एक छोटासा उपाय करून तुम्ही या समस्येतून बाहेर पडू शकता. (astrology tips for marriage in hindi do this things you will get benefits of it)

हे वाचलं का?

ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्ही विवाहासाठी इच्छुक असाल आणि तुमचं लग्न जमत नसेल तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. आपल्या सर्वांच्या घरात हळद असतेच. थोडीशी हळद अंघोळीच्या पाण्यात टाकून नंतर स्नान करायचं आहे. हा प्रयोग तुम्हाला काही दिवस करावा लागणार आहे. असं केल्यानंतर तुमचं लग्न होण्यामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत, त्या दूर होऊन तुमच्या विवाहाचे योग येऊ शकतात आणि तुमचं लग्न होऊ शकतं.

पाण्यात हळद टाकून अंघोळ करण्यामागचं लॉजिक काय? 

हळद टाकून अंघोळ करण्यामागील लॉजिक असं आहे की, हळद गुरुला अत्यंत प्रिय असते. गुरुला पिवळा रंग हा प्रिय असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून अंघोळ करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यास मदत होते. जेव्हा तुमचा गुरु ग्रह मजबूत असतो तेव्हा तुम्हाच्या लग्नासंबंधीत ज्या अडचणी असतात त्याचं निवारण होतं, असं शास्त्रात म्हटलं आहे.

गुरु ग्रह मजबूत करणे का आवश्यक आहे?

गुरु ग्रह मजबूत करणे आवश्यक आहे. खूप हळद घ्यावी लागेल असे नाही, फक्त चिमूटभर हळद घ्यावी लागेल. आपले पाणी पूर्ण पिवळे करू नका. साधारणपणे थोड्या पिवळसर पाण्यात अंघोळ करा. येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील. बृहस्पति कमकुवत असेल तर व्यक्तीला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे गुरू ग्रह मजबूत करणे आवश्यक आहे. 

 

    follow whatsapp