Cyber Fraud : एक चुकीचा क्लिक तुमचं अकाऊंट करेल रिकामं, e-Pan Card च्या नावाचा फेक मेलचा प्रकार काय?

PIB फॅक्ट चेकच्या पोस्टमध्ये एक इमेल दाखवला आहे, तसंच हा ईमेल खोटा आहे, अशा कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका, असं आवाहन करण्यात करण्यात आलं आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:11 PM • 22 Dec 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

फसवणुकीचे नवनवीन पॅटर्न

point

कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी व्हा सावध

point

काय आहे e Pan Card च्या नावे होणारा फसवणुकीचा प्रकार?

आजच्या काळात आपण सगळेच आपल्या मोबाईलमध्ये कागदपत्र आणि आयडीकार्ड सेव्ह करुन ठेवत असतो. मग त्यामध्ये ऑफिस आयडीपासून तुमचे वेगवेगळे ओळखपत्र असतात. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण तुम्ही जर पॅन कार्ड डाऊनलोड करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.  PIB Fact Check च्या अधिकृत X अकाऊंटवर अशीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये काही फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

पीआयबी फॅक्ट चेकच्या पोस्टमध्ये काय?

PIB फॅक्ट चेकच्या पोस्टमध्ये एक इमेल दाखवला आहे, तसंच हा ईमेल खोटा आहे, अशा कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका, असं आवाहन करण्यात करण्यात आलं आहे. तसंच तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, कॉल किंवा एसएमएस वर तुमचा कोणताही वैयक्तिक बँकिंग तपशील इत्यादी शेअर करू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. 

...अन्यथा तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं

चुकूनही या फेक इमेल्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करु नका. तुम्ही क्लिक केल्यास तुमचं बँक खातं सुद्धा रिकामं केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं.

जर तुम्ही या बनावट ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केलं, तर तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळे तुमच्या मोबाईलमधील डेटा लिक होऊ शकतो. 

ई-पॅन कार्ड कसे मिळवाल?

ई-पॅन कार्ड मिळवण्यासाठी, तुम्हाला भारत सरकारच्या आयकर विभागाच्या अधिकृत  वेबसाइटवर जावं लागेल. यानंतर यूजर्सना तिथे ई-पॅन कार्डचा पर्याय मिळेल. सांगितलेली सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आपण सहजपणे ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.

    follow whatsapp