EPFO New Rule : ATM ने पैसे काढता येणार, एमर्जन्सी फंड... मार्च 2024 पासून EPFO 3.0 मध्ये काय काय मिळणार ?

मुंबई तक

17 Dec 2024 (अपडेटेड: 17 Dec 2024, 04:12 PM)

EPFO 3.0 Latest Updates: कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे PF सदस्यांना पैसे काढण्याची, खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्याची आणि वेगवेगळ्या अडचणी अधिक सहजपणे सोडवण्यास मदत होणार आहे.

Mumbaitak
follow google news

EPFO सध्या नवीन प्रणालीवर काम करत आहे. लवकरच पीएफ सदस्यांना नवीन सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे आता अनेक कामं सुलभ होणार आहेत. या नव्या प्रणालीला EPFO ​​3.0 असं नाव देण्यात आलं आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, EPFO ​​3.0 मार्च 2025 पासून सुरू होऊ शकते. या प्रणालीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे PF सदस्यांना पैसे काढण्याची, खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्याची आणि वेगवेगळ्या अडचणी अधिक सहजपणे सोडवण्यास मदत होणार आहे. सर्व प्रक्रिया सुलभ करणे आणि अडचणी सहजपणे सोडवता याव्यात याच उद्दीष्टाने EPFO ​​3.0 लाँच करण्यात आली आहे. 

 

हे ही वाचा >> 17 September 2024 Horoscope : लव्ह लाईफमध्ये 'या' राशीच्या लोकांना मिळेल यश! काहींच्या संपत्तीत होईल भरमसाठ वाढ


मनसुख मांडविय पुढे म्हणाले, या नवीन प्रणालीद्वारे लोकांना त्यांचे पैसे सहज मिळू शकतील. तसंच आतापर्यंत ५० टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.


एटीएममधून काढता येणार पैसे

EPFO 3.0 च्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सदस्यांना ATM सारखी कार्ड वापरून त्यांचे पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. 

तुम्ही जानेवारी 2025 पासून पैसे काढू शकाल

कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितलं की, या सुविधा जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध होऊ शकतात. ज्यामुळे सदस्यांच्या अनेक अडचणी सुटणार आहेत. सध्याच्या व्यवस्थेतील मर्यादा दूर करणे हा या नव्या तांत्रिक सुधारणांचा उद्देश आहे.

कोणकोणत्या सुविधा?

नव्या प्रणालीनुसार तयार करण्यात आलेला प्लॅटफॉर्म हे सुनिश्चित करेल की, सदस्य सहजपणे त्यांची खाती ऑनलाइन वापरू करू शकतील, त्यांच्या खात्याची स्थिती तपासू शकतील आणि आवश्यकतेनुसार पैसे काढू शकतील. 

    follow whatsapp