Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर नेहमीच अशाप्रकारचे फोटो पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या गेम्स खेळू शकता. या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे हा एक बुद्धीचा मोठा खेळच असतो. कधी फोटोमधील चुका शोधायच्या असतात तर कधी वेगवेगळे प्राणी. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका फोटोत 'पुष्पा'मध्ये लपलेलं 'प्यार' शोधायचं आहे. म्हणजे पुष्पा या शब्दांच्या गर्दीत प्यार नावाचा शब्द लपला आहे, हा शब्द शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 7 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
फोटोला पाहिल्यावर तुम्हाला दिसेल की, सर्व ठिकाणी पुष्पा असं लिहिलं आहे. जर तुम्ही या फोटोत लिहिलेल्या पुष्पा शब्दांमध्ये प्यार हा शब्द शोधून दाखवला, तर हे नक्कीच सिद्ध होईल की, तुमचं आय क्यू लेव्हल खूप चांगलं आहे. आम्ही असं यासाठी म्हणत आहोत की, या फोटोत प्यार शब्द शोधण्यात अनेकांना यश आलं नाही.
हे ही वाचा >> PM Narendra Modi: "भारताच्या राष्ट्रपतीपदावर एक आदिवासी महिला..."; संविधानाच्या उत्सवात पंतप्रधान मोदींचं मोठं विधान!
पण ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे, तेच लोक या फोटोत लपलेला प्यार शब्द शोधून दाखवू शकतात. जर तुम्ही या फोटोत लपलेला प्यार शब्द सात सेकंदांच्या आत शोधून दाखवलं, तर तुमच्याकडे गरुडासारखी नजर आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही या फोटोला नीट पाहिलं, तर तुम्हाला पुष्पा शब्दांमध्ये लपलेला प्यार हा शब्द नक्कीच दिसेल.
हे ही वाचा >> Kangana Ranaut: PM नरेंद्र मोदी का भेटतात बॉलिवूड सेलिब्रिटींना? कंगना राणौतनं दिलं खळबळजनक उत्तर, म्हणाली...
जर तुम्हाला आणखी कुणाचा आय क्यू लेव्हल चेक करायचा असेल, तर यासाठी हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो परफेक्ट उदाहरण आहे. या फोटोमुळे तुमच्या बुद्धीला तर चालना मिळणारच आहे पण डोळ्यांचीही चांगली कसरत होईल. ज्या लोकांना या फोटोत प्यार शब्द दिसला आहे, त्यांचं सर्वांचं अभिनंदन, पण ज्यांना पुष्पा शब्दाच्या गर्दीत लपलेला प्यार शब्द दिसला नाही, त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून पुष्पा शब्दांच्या गर्दीत लपलेला प्यार शब्द शोधायचा आहे. जे लोक बुद्धी कस लावतील त्यांना नक्कीच या फोटोत लपलेला प्यार शब्द शोधता येईल. ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत प्यार शब्द शोधणे वाटतं तितकं कठीण पण नाही. फक्त तुम्हाला तीक्ष्ण नजरेने हा फोटो पाहण्याची आवश्यकता आहे.
ADVERTISEMENT