Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana, Fourth Installement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 30 लाख महिलांच्या पाच महिन्यांचे योजनेचे पैसे जमा झाले आहेत. विशेष म्हणजे पाच महिने म्हणजेच नोव्हेंबरपर्यंतच पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, तर काहींच्या खात्यात अद्याप पैसेच आले नाहीयेत. त्यामुळे तुमच्या बाबतीत जर ही घटना घडली असेल, तर अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. यासोबतच आम्ही तुम्हाला आणखी एक पर्याय सांगणार आहोत. या पर्यायाद्वारे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा का झाले नाही आहेत? याची माहिती मिळणार आहे. (ladki bahin yojana forth and fifth installment does not deposite women account how to check your name in list mukhymantri ladki bahin yojana scheme)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेची एक यादी समोर आली आहे. या यादीत जर तुमचं नाव असेल, तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या यादीत तुमचं नाव आहे की नाही? हे कसे तपासायचं हे जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर तुमच्या शहराच नाव आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन टाकायचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे. धुळे कॉर्पोरेशन टाकल्यावर नवीन पेज उघडणार आहे. यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण-लाभार्थी यादी धुळे म्युनसिपल कॉर्पोरेशन असा येईल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेजवर यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय येणार आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला यादी डाऊनलोड करता येणार आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, उरली शेवटची संधी...7500 आणि 3000 खात्यात कधी जमा होणार?
ही यादी डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमच्या अॅप्लिकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर आणि अर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या नाव किंवा अॅप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे.
अशाचप्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येणार आहे. एकतर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगर पालिकेच्या वेबसाईटवर मिळेल किंवा ही यादी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे. जर तरीही यादी सापडली नाही तर तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीणसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना या यादीबद्दल किंवा पैशांबद्दल विचारणा करता येणार आहे. त्यामुळे अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर ही यादी नक्की तपासा.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा
दरम्यान या योजनेत अनेक महिलांच्या खात्यात 7500 देखील जमा होणार आहे. ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकही रूपया जमा झाला नाही आहे.त्या महिलांच्या खात्यात 7500 जमा होणार आहे. आज असं म्हटलं जातंय चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे येण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे 7500 खात्यात येण्याची ही शेवटची संधी असणार आहे.
ADVERTISEMENT