Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना मोठा झटका, खात्यात पैसे जमा होण्याची संपली मुदत?

मुंबई तक

10 Oct 2024 (अपडेटेड: 10 Oct 2024, 08:37 PM)

Mukhyamantri ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचे म्हणजेच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे जमा झाले आहेत. या टप्प्यात काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काहींच्या खात्यात पैसे अद्याप आलेच नाहीयेत. अशात आता चौथा आणि पाचवा हप्ता खात्यात जमा होण्याची मुदत संपल्याची माहिती समोर आली आहे.

ladki bahin yojana scheme forth and fifth installment not deposite women bank account last date end does money deposite or not

काहींच्या खात्यात पैसे अद्याप आलेच नाहीयेत

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींना मोठा धक्का

Mukhyamantri ladki Bahin Yojana Scheme, Fourth Installement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचे म्हणजेच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे जमा झाले आहेत. या टप्प्यात काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काहींच्या खात्यात पैसे अद्याप आलेच नाहीयेत. अशात आता चौथा आणि पाचवा हप्ता खात्यात जमा होण्याची मुदत संपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत, त्यांना मोठा धक्का बसणार आहे. (ladki bahin yojana scheme forth and fifth installment not deposite women bank account last date end does money deposite or not) 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते. आज ही मुदत संपूष्टात आली आहे. आता उद्यापासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत की नाही, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत त्यांना मोठा धक्का बसणार आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : चौथ्या हप्त्यात 3000 खात्यात आलेच नाही? ही यादी आताच तपासून घ्या

कुणाच्या खात्यात किती पैसे आले? 

आता ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित मिळून 4500 जमा झाले होते. त्या महिलांच्या खात्यात आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित पणे 3000 रूपये जमा होणार आहे. यासह जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रूपयाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यात त्या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले होते. आता या महिलांच्या खात्यात देखील ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित मिळून 3000 जमा झाले आहेत.तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर आधी अर्ज केले आहेत.पण त्यांच्या खात्यात अद्याप एकही महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता. त्यांच्या खात्यात आता जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे एकत्रितपणे 7500  रूपये जमा झाले आहेत.

आता काही महिलांच्या खात्यात चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे जमा देखील झाले आहेत. पण काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीयेत.  हे पैसे 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची अंतिम तारीख होती. आता या तारखेची मुदत संपूष्ठात आली आहे. त्यामुळे आता मुदत वाढवून मिळते की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp