Ladki Bahin Yojana : 4500 अजूनही जमा झाले नाही, 'ही' यादी आताच चेक करा

मुंबई तक

05 Oct 2024 (अपडेटेड: 05 Oct 2024, 04:13 PM)

Mukhymantri ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रूपये जमा झाले आहेत. पण अद्याप अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमाच झाले नाही आहेत. त्यामुळे तुमच्या बाबतीत जर ही घटना घडली असेल, तर अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

ladki bahin yojana third installment does not deposite women account how to check your name in list mukhymantri ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde

अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमाच झाले नाही आहेत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

4500 जमाच झाले नाही, महिलांनी काय करावे?

point

अंगणवाडी सेविकांकडे तक्रार करा दाखल

point

लाभार्थी यादीत नाव तपासा

Mukhymantri ladki Bahin Yojana Scheme, Third installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500  रूपये जमा झाले आहेत. पण अद्याप अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमाच झाले नाही आहेत. त्यामुळे तुमच्या बाबतीत जर ही घटना घडली असेल, तर अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. यासोबतच आम्ही तुम्हाला आणखी एक पर्याय सांगणार आहोत. या पर्यायाद्वारे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा का झाले नाही आहेत? याची माहिती मिळणार आहे. (ladki bahin yojana third installment does not deposite women account how to check your name in list mukhymantri ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde) 

हे वाचलं का?

 लाडकी बहीण योजनेची एक यादी समोर आली आहे. या यादीत जर तुमचं नाव असेल, तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या यादीत तुमचं नाव आहे की नाही? हे कसे तपासायचं हे जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर तुमच्या शहराच नाव आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन टाकायचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे. धुळे कॉर्पोरेशन टाकल्यावर नवीन पेज उघडणार आहे. यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण-लाभार्थी यादी धुळे म्युनसिपल कॉर्पोरेशन असा येईल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेजवर यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय येणार आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला यादी डाऊनलोड करता येणार आहे.   

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? आकडा एकूण दिवाळी दणक्यात कराल साजरी!

ही यादीत डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमच्या अॅप्लिकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर आणि अर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या नाव किंवा अॅप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. 

अशाचप्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येणार आहे. एकतर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगर पालिकेच्या वेबसाईटवर मिळेल किंवा ही यादी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे. जर तरीही यादी सापडली नाही तर तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीणसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना या यादीबद्दल किंवा पैशांबद्दल विचारणा करता येणार आहे. त्यामुळे अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर ही यादी नक्की तपासा.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही, कारण...

चौथा हप्ता कधी मिळणार? 

ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत.त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे.  ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे. त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सूरूवात केली आहे. त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे. जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल, तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 खात्यात येणार आहेत. 

    follow whatsapp