ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारने 'असं' दिलं दिवाळीआधी गिफ्ट, थेट खात्यात जमा होणार 3000

मुंबई तक

14 Oct 2024 (अपडेटेड: 17 Oct 2024, 06:29 PM)

Mazi ladki Bahin Yojana Diwali Bonus Update: राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.

ladki bahin yojana scheme fourth and fifth installment 3000 amount deposite only these women account mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde

महिलांची दसरा, दिवाळी गोड होणार

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस, फक्त 'या' अटी करा पूर्ण

point

दिवाळी बोनसबाबत सरकारने केली मोठी घोषणा

Mazi ladki Bahin Yojana Diwali Gift Update: राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी सुरु केली आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने सरकारने दिवाळीआधीच महिलांसाठी खास भेट दिली आहे. सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे एकत्र दिले आहेत. त्यामुळे राज्यभरातील अनेक महिलांसाठी हा जणू बोनसच ठरला आहे. (maharashtra government give diwali gift to women of rs 3000 to ladki bahin yojana)

हे वाचलं का?

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हाच या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही नियमावलीचं पालन करावं लागतं. वय 21 ते 60 वर्षांमध्ये असलं पाहिजे. महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजेत. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे. 

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : दिवाळीआधीच 'या' राशीच्या व्यक्तींचं नशीब चमकणार! उद्योगधंद्यातून मिळेल बक्कळ पैसा

Click here for Maharashtra Election 2024 Date Live Updates:

सरकारने म्हटलंय की, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे एकत्रिरित्या योजनेच्या सर्व पात्र महिलांना दिले जाणार आहेत. म्हणजे राज्यातील महिलांना 3000 रुपये देण्यात येत आहेत.

कोणाला मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे एकत्र?

1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे. 
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपये एकत्र म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळतील. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. 

    follow whatsapp