Maharashtra Weather Forecast IMD Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही भागात अधूनमधून हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याचं दिसून आला. परतीचा पाऊस महाराष्ट्रातून माघारी फिरलेला असला तरी, काही ठिकाणी राज्यात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. एकीकडे अरबी समुद्र आणि दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असल्यानं देशात सध्या पाऊस कोसळत आहे. त्यानंतर आज राज्यातही काही ठिकाणी तुरळक स्वरुपात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या 24 तासात राज्यात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Lawrence Bishnoi : लॉरेन्स गँगचं नेटवर्क उध्वस्त होणार? NIA कडून अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचं बक्षीस | Ajit Pawar NCP 2nd List|
राज्यातील मध्य महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर इतर काही जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावू शकतो. तर मुंबई आणि पुण्यात काहीसं ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे.
राज्यात कुठे कुठे ढगाळ वातावरण?
हे ही वाचा >>Aditya Thackeray Net Worth : आदित्य ठाकरेंची संपत्ती किती वाढली?
लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, यवतमाळ वर्धा, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, परभणी या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना हे चक्रीवादळ आज, किनारपट्टीवर धडकलंय. ओडीशामध्ये हे वादळ दाखल झालं असून, भुवनेश्वर जवळ या वादळाचं केंद्र आहे. यावेळी ताशी 110 ते 120 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहेत. या वादळामुळे महाराष्ट्राला किती धोका पोहोचणार याबद्दल सध्या नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं आधीच मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसणार का? असा प्रश्न पडत होता. मात्र, अद्यापतरी या वादळाचा महाराष्ट्राला कुठलाही धोका पोहोचणार नाही असं चित्र आहे.
ADVERTISEMENT