मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. पण अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय?, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या तर काय फायदा होतो?, भारतात आतापर्यंत कोण-कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे सगळं आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (marathi got the status of classical language but what benefits will it get)
ADVERTISEMENT
आतापर्यंत कोणकोणत्या भाषांना मिळालाय अभिजात भाषेचा दर्जा?
अभिजात भाषेचा दर्जा भारतात 2004 मध्ये तामिळ, 2008 मध्ये कन्नड, 2013 मध्ये मल्ल्याळम, 2008 मध्ये तेलुगू, 2014 मध्ये ओडिया, 2005 मध्ये संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
आता मराठीसोबत पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
हे ही वाचा>> मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी मोदींचा मोठा निर्णय
अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळतो? यासाठी 2014 मध्येच राज्यसभेत केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार काही मार्गदर्शक तत्व आहेत, काही निकष आहेत, ते पूर्ण केले तरच अभिजात भाषेचा दर्जा मिळतो.
1. भाषेचा इतिहास किमान 1500-2000 वर्षे जुना हवा
2. प्राचीन साहित्य हवं, जे ती भाषा बोलणाऱ्यांसाठी मौल्यवा असेल.
3. साहित्यिक परंपरा ही त्याच भाषेची हवी, दुसऱ्या भाषेतून घेतलेली नसावी
4. अभिजात भाषा आणि त्यातलं साहित्य हे आताच्या भाषेपेक्षा वेगळं असायला हवं.
प्राचीन महारठ्ठी, मरहट्टी, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास आहे. मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथासप्तशती हा सुमारे 2000 वर्षे जुना आहे. यासोबतच ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र हे देखील ग्रंथ आहेतच.
हे ही वाचा>> ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्लेंचं निधन, ‘रक्त आणि पाऊस’ सारखी अभिजात साहित्यकृती लिहिणारी लेखणी शांत
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येईल की नाही, त्यासाठीचे निकष पूर्ण होतात की नाही हे पाहण्यासाठी 2012 मध्ये केंद्र सरकारने प्राध्यापक साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने मराठी भाषा, संस्कृती, साहित्याचा अभ्यास केला. अहवालात मराठी भाषेला 2 हजार वर्षांचा इतिहास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते. मराठी भाषा प्राचीन असून या भाषेत सतत श्रेष्ठ दर्जाची वाड्:मय निर्मिती होत असल्याचाही उल्लेख अहवालात आहे. आणि म्हणूनच अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकषही मराठी भाषा पूर्ण करीत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
यानंतर पुढची प्रक्रिया असते ती म्हणजे सांस्कृतिक खातं हा अहवाल पाहून पुढील कार्यवाहीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवतं. आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचीही मान्यता घ्यावी लागते. या सगळ्या प्रक्रिया पार पडल्या आणि अखेर आज (3 ऑक्टोबर 2024) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
2013 मध्येच मराठी भाषेबाबत अहवाल देण्यात आला होता. तत्कालीन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्लीत जाऊन सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेतलेली
अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आता नेमके कोणकोणते फायदे मिळणार?
भाषांच्या विकासासाठी, त्या अधिकाधिक समृद्ध व्हाव्यात यासाठी केंद्राकडून प्रत्येक वर्षी अंदाजे 2500-300 कोटी रुपयांचं अनुदान मिळतं.
त्याचबरोबर भाषा भवन, ग्रंथ व साहित्य प्रसार, ग्रंथालये, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रचार-प्रसार होणाऱ्या प्रकल्पांसाठी आर्थिक मदतही केली जाते.
केंद्रीय विद्यापीठांमध्ये मराठी विभाग तयार होऊ शकतो.
मराठी भाषा आणि साहित्याच्या अभ्यासात उत्तम कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार.
ADVERTISEMENT