मुंबई: बँका आणि इतर आस्थापनांमध्ये मराठीतूनच व्यवहार झाले पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या राज ठाकरे आणि मनसेला आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ टॅग करून यूजर्स काही सवाल विचारत आहेत.
ADVERTISEMENT
'तो' Viral Video राज ठाकरेंना का केला जातोय टॅग?
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ मुंब्रा येथील काही महिन्यांपूर्वीचा आहे पण सध्या हाच व्हिडिओ राज ठाकरेंना टॅग केला जात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या बराच व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर एक मुलगा माफी मागतोय आणि त्याच्या आजूबाजूचे लोक हे त्याला 'हिंदीमधून माफी माग' असा आग्रह करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे तो आत्ताच का व्हायरल होतोय आणि राज ठाकरेंचं नाव घेत तो त्यांना का टॅग का केला जातोय? या व्हिडिओ चं नेमकं सत्य काय आहे? हेच आपण आता सविस्तर जाणून घेऊया.
हा व्हिडिओ नेमका काय आहे तो कधीच आहे हे सगळं जाणून घेण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताना यूजर्स काय म्हणत आहेत. ते आपण आधी पाहूया.
एका यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि व्हिडिओ शेअर करताना असं म्हटलेलं की, 'हॅलो राज ठाकरे तुमचा मराठी माणूस मुंब्रामध्ये काही करू शकत नाही का?
असे अनेक ट्वीट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओ मधून राज ठाकरेंना सोशल मीडियावरचे लोक जाब विचारत आहेत की, एका मराठी मुलाला माफी मागायला लावतायेत हे सगळे आजूबाजूचे लोक आणि अशामध्ये मनसे काय करतेय?
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर मनसैनिकांनी पुन्हा एकदा मराठी भाषेसाठी आंदोलनं सुरु केली होती. पण आता त्यानंतर हा व्हिडिओ अचानक व्हायरल झाला.
दरम्यान, दुसऱ्या यूजरने म्हटलंय की, 'मराठी माणसाकडून कान पकडून माफी मागून घेतली. त्यांच्या विरोधात मनसेने दंड थोपटेल का? त्या बिचारा मुलाला न्याय मिळवून देईल का? आता हा व्हिडिओ शेअर करत मनसेने मुलाला न्याय मिळवून दिला का? या मुलाचं पुढे काय झालं?' हा सगळा जो जाब आहे तो लोकं विचारत आहेत.
नेमका व्हिडिओ काय?
आता हा व्हिडिओ नेमका काय आहे? तो कधीच आहे या व्हिडिओची नेमकी सत्यता काय आहे ते आपण जाणून घेऊयात.
जर तुम्ही बघितलं तर मुंबई Tak ने तीन महिन्यांआधीच या व्हिडिओसंदर्भात बातमी केली होती. म्हणजेच या व्हिडिओची सत्यता ही आम्ही आधीच तपासली होती. त्यामुळे असं समजलं की, हा व्हिडिओ तीन महिन्याआधीचा आहे. म्हणजेच 2 जानेवारीची ही सगळी घटना आहे.
ही घटना नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊया. विशाल गवळी नावाचा हा मुलगा आहे जो की व्हायरल होतोय, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एकवीस वर्षाचा हा मुलगा आहे आणि मुंब्रामधल्या आयडियल मार्केटमध्ये हा मुलगा फळं घेण्यासाठी गेला होता. आणि जेव्हा त्याने फळ विक्रेत्याला फळांची किंमत विचारली तेव्हा त्याने हिंदीमधून उत्तर दिलं आणि या मुलाने असं म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठीत बोला तेव्हा तो फळ विक्रेता म्हणाला हमको मराठी नहीं आती हम हिंदी में ही बोलेंगे त्यानंतर या मुलाने त्याला जाब विचारला आणि तिथे गर्दी जमली.
एकीकडे मराठीसाठी आग्रह धरणाऱ्या या मुलाला जमलेल्या जमावाने हिंदीमधून माफी मागायला भाग पाडलं. या जमावानं या मुलावर असा आरोप केला होता की, हा मुलगा असं म्हणत होता की मराठी बोलो नही तो मुंब्रा बंद कर दुंगा...
दरम्यान, आता हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात, व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलं होतं. या मुलावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी या मुलाने मनसेच कार्यालय गाठलं होतं आणि अविनाश जाधव मनसेचे नेते आहेत. त्यांनी असं म्हटलं की या मुलाला हात तर लावून दाखवा. नंतर बघा मनसे काय करतंय.
मनसेनं त्यानंतर सुद्धा त्यावेळेला म्हणजेच 2 जानेवारीला मुलासाठी धावून आलेली होती. त्यावेळेला मनसेने या मुलाला मदत केलेली होती. पण आता पुन्हा एकदा जेव्हा मराठीसाठी मनसे जे आंदोलन करतंय ते पाहून काही यूजर्संना या जुन्या व्हिडिओची आठवण झाली आहेय.
पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मनसैनिकांना असं आवाहन केलेलं की, बँक असतील किंवा आस्थापने असतील तिथे मराठी भाषा वापरली जाते आहे का हे तपासा आणि त्यानंतर मनसैनिकांनी मराठीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलेलं होतं. पण त्यानंतर राज ठाकरेंनी पत्र लिहत हे आंदोलन थांबवायला सांगितलेलं होतं.
दरम्यान, सोशल मीडियावर लोकांनी राज ठाकरेंना पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली. राज ठाकरेंना जाब विचारायला सुरुवात केली की तुम्ही मराठीसाठी एवढे आंदोलन मनसैनिक करतात आणि हे सगळं सुरू असताना सुद्धा या मुलाला माफी का मागायला लाव लावली जाते?
Fact Check
दरम्यान, जेव्हा या व्हिडिओचा फॅक्ट चेक केलं तेव्हा असं समजलं की हा व्हिडिओ 2 जानेवारीचा आहे. म्हणजेच तीन महिने जुना व्हिडिओ आहे. एकूणच मराठी बोलण्यासाठी मनसेकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली जातात आणि अशामध्येच हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
काही लोकांनी असं म्हटलेलं की ठरवून मुंब्र्याला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ आता व्हायरल केला जातो आहे. पण एकूणच जर बघितलं तर हा व्हिडिओ जुना आहे
सध्या मराठीबाबत आंदोलनं सुरु आहेत मराठीचा जो काही आग्रह मनसैनिकांकडून केला जातोय किंवा त्यासंबंधी जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहता आता या प्रकरणी आता मनसे काय भूमिका घेतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
