Post Office Saving Schemes : मालामाल करणारी पोस्टाची योजना! एकदा गुंतवणूक करा, मिळवा भरघोस परतावा, A टू Z माहिती

मुंबई तक

19 Oct 2024 (अपडेटेड: 19 Oct 2024, 11:50 AM)

पोस्टाच्या senior citizen saving scheme च्या माध्यमातून दर महिन्याला तुम्हाला परतावा मिळत राहील. या योजनेच्या माध्यमातून पाच वर्षापर्यंत दरमहा तुम्हाला 20,500 रुपये मिळू शकतील.

मालामाल करणारी पोस्टाची योजना!

मालामाल करणारी पोस्टाची योजना!

follow google news

बातम्या हायलाइट

point

पोस्टाची सीनियर सिटिझन्स सेव्हिंग योजना

point

निवृत्तीनंतर मिळणारा परतावा

point

पाहा किती आहे परताव्याची रक्कम

Post Office Senior Citizen Scheme मुंबई : सरकारकडून पोस्ट खात्याअंतर्गत अनेक योजना चालवल्या जातात. ज्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत असतो. कारण या योजनांमधून मिळणारा परतावा हा चांगला असतो. त्यामुळे पोस्टाच्या लहान लहान योजनांकडेही गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करून त्याचा लाभ घेत असतात. 

हे वाचलं का?

गुंतवणूक करण्यासाठी पर्याय शोधणाऱ्या अनेकांसाठी पोस्टाची एक योजना उत्तम पर्याय आहे. त्यामुळे ही योजना नेमकी कोणती आहे, त्यामाध्यमातून मिळणारा परतावा किती असतो याबद्दलच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. या योजनांमध्ये एकदा एका ठराविक रकमेची गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा चांगला परतावा मिळू शकतो. 

पोस्टाची सीनियर सिटिझन्स सेव्हिंग योजना

हे ही वाचा >>ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! दिवाळी बोनस नक्की मिळणार का? सरकारने दिली मोठी अपडेट

 

ही एक अशी योजना आहे, ज्यामाध्यमातून तुम्हाला रिटायरमेंटनंतर दर महिन्याला तुम्हाला परतावा मिळत राहील. या योजनेच्या माध्यमातून पाच वर्षापर्यंत दरमहा तुम्हाला 20,500 रुपये मिळू शकतील. या योजनेतून मिळणारा इंटरेस्ट रेट हा 8.2 टक्के एवढा आहे. कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वार्षिक व्याजदरापेक्षा हा व्याजदर मोठा आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड पाच वर्ष एवढा असतो. तसंच पाच वर्षानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत काही वेगळे पर्याय सुद्धा मिळतात. 

किती करावी लागेल गुंतवणूक? 

हे ही वाचा >>Today Gold Rate: बाईईई...दिवाळीआधीच सोनं गडगडलं! मुंबईसह 'या' 15 शहरांमध्ये 1 तोळ्याचा दर काय?

 

सुरूवातीला या योजनेत गुंतवणुकीची मर्यादा ही 15 लाखांपर्यंत होती, मात्र आता या योजनेत तुम्ही 30 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही 30 लाखांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 8.2 टक्क्यांच्या व्याजदरानुसार वर्षाला तब्बल 2,46,000 हजार रुपये मिळू शकतात. अर्थातच तुम्हाला वर्षाला 20,500 रुपयांचा परतावा मिळतो. त्यामुळे तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा एका ठराविक रक्कम परतावा म्हणून मिळते.

कोण-कोण करू शकतं गुंतवणूक? 

पोस्टाच्या या योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल. SCSS या योजनेत 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. तसंच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले 55 ते 60 वर्षांचे नागरिकही गुंतवणूक करू शकतात. 

दरम्यान, या योजनेची आणखी सविस्तर माहिती घेण्यासाठी किंवा तपशील जाणून घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 
 

    follow whatsapp