Horoscope In Marathi: वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशीचं आकलन केलं जातं. आजा 18 ऑक्टोबरला शनिवार आहे. शनिवारच्या दिवशी शनीदेवाची पूजा केल्याने संकटं दूर होऊ शकतात. आजचा दिवस कोणत्या राशींसाठी लाभदायक राहील आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार? याबाबत जाणून घ्या सविस्तर राशी भविष्य.
ADVERTISEMENT
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा राहिला. तुमची आर्थिक प्रगती होईल. लव्ह लाईफ सुधारेल. सोनं खरेदी करताना विचार करा. तणावात राहून काम करू शकता.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांना मोठ्या प्रकल्पात आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रवासादरम्यान सेलिब्रिटीसोबत संवाद होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम करा. बाहेरील प्रवासाचा योग येईल. कोर्ट-कचेरीत सुरु असलेल्या संपत्तीत वाढ होईल.
हे ही वाचा >> Ladki Bahin Free Gas Cylinder: लाडक्या बहिणींनो! फ्री मध्ये मिळणार 3 गॅस सिलेंडर! 'असा' करा अर्ज
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या थोडं सावध राहावं लागेल. पैसे कमवण्यासाठी योग्य पद्धतीने गुंतवणूक करा. एखाद्या प्रकल्पात नफा होऊ शकतो.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. एखाद्या योजनेत गुंतवणूक केलेला पैशांमध्ये नफा होईल. फिटनेसबाबत काळजी घ्या. तणावात काम करु नका. प्रवास आनंददायी राहील.
कन्या राशी
आज कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. कार्यलयात तुमची कामगिरी चांगली राहील. कौटुंबीक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. नवीन संपत्ती खरेदी करण्याच योग आहे. व्यापारात वाढ होईल.
तुळा राशी
तुळा राशीचे लोक आर्थिकदृष्या मजबूत राहतील. मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी योग करा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कौटुंबिक सहकार्य मिळेल. संपत्ती खरेदी करण्याचा योग येऊ शकतो.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांना गूंतवणुकीचा चांगला फायदा होईल. सकस आहारामुळं आरोग्य उत्तम राहील. कामात तुम्हाला पॉजिटिव्ह रिझल्ट मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्याची चांगली वेळ आहे.
हे ही वाचा >> Ladki Bahin Free Gas Cylinder: लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट, मोफत सिलेंडर मिळणार!
धनू राशी
धनू राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. पैसे कमवण्यासाठी चांगला योग येऊ शकतो. डाएटवर नियंत्रण ठेऊन व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. परदेशात जाण्याचा योग येईल.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आर्थिक संपत्तीत वाढ होईल. रोजच्या लाईफस्टाईलमध्ये व्यायामाचा समावेश करा. काही लोकं नवीन व्यावसाय सुरु करू शकतात.
कुंभ राशी
कुंभ राशीचे लोक चांगल्या कमाईची अपेक्षा करू शकतात. शारिरीक आरोग्य उत्तम ठेवा. आर्थिक संपत्तीत वाढ होऊ शकते. एखाद्या जुन्या नातेवाईकाशी मुलाखत होऊ शकते. संपत्ती खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांचं नशीब लवकरच चमकणार आहे. रोज व्यायाम केल्यानं तुमचं आरोग्य सुधारेल. पार्टनरच्या शोधात असलेल्या लोकांचं स्वप्न पूर्ण होईल. दूरचा प्रवासाचा योग येईल.
टीप - राशी भविष्याची माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तक या राशी भविष्याची पुष्टी करत नाही.
ADVERTISEMENT