Optical Illusion IQ Test : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला एक सुंदर निसर्गाचं चित्र दिसेल. पण या चित्रात निसर्गाशिवाय एक हत्तीही लपला आहे. हा हत्ती शोधण्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागेल. कारण या चित्रात लपलेला हत्ती शोधणं वाटतं तितकं सोपं नाही. जी माणसं या चित्राला तीक्ष्ण नजरेनं पाहतील, त्यांनाच या चित्रात लपलेला हत्ती शोधता येणार आहे. या चित्रात लपलेला हत्ती शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदांची वेळ दिली आहे.
ADVERTISEMENT
तुम्ही या फोटोला नीट पाहिलं, तर तुम्हाला या फोटोत निसर्गाच्या चित्राशिवाय एक मोठा प्राणी म्हणजेच हत्तीही दिसेल. या व्हायरल फोटोमध्ये जे चित्र आहे, त्यात दोन नारळांची झाडे दिसत आहेत. त्या नारळांच्या झाडांजवळ दोन झोपड्याही असल्याचं पाहायला मिळत आहे. पण या झाडांजवळ कुठेतरी मोठा हत्ती लपला आहे. हा हत्ती दहा सेकंदांच्या आता शोधणं तुमच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. शर्थीचे प्रयत्न करुनही तुम्हाला या फोटोत लपलेला हत्ती शोधता आला नाही, तर अजिबात टेन्शन घेऊ नका.
हे ही वाचा >> Eknath Shinde : "लाडक्या बहिणींना टच कराल, तर...", CM एकनाथ शिंदेंनी दिला मोठा इशारा
कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, या फोटोत हत्ती नेमका कुठे लपला आहे, हे शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीला चालना द्यावी लागेल. ज्या लोकांना फोटोत लपलेला हत्ती शोधता आला नाही, त्यांना आम्ही सांगणार आहोत, या फोटोत हत्ती नक्की कोणत्या ठिकाणी लपला आहे. आम्ही खाली दाखवलेल्या फोटोत तुम्ही पाहू शकता की, या चित्रात हत्तीला मार्क करण्यात आलं आहे. निसर्गाचं चित्रच हत्तीच्या आकारासारखं असल्याचं तुम्ही पाहू शकता.
ऑप्टिकल इल्यूजनचा बुद्धीला चालना देणारे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. अनेकदा ऑप्टिकल इल्यूजनचे असे फोटो व्हायरल होतात, ज्यामध्ये लपलेल्या बारीक-सारीक गोष्टी शोधणं मोठं आव्हानच असतं. पण ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, अशी माणसं या फोटोत लपलेल्या गोष्टी वेळेत शोधू शकतात.
ADVERTISEMENT