Poonam Mahajan: 'प्रमोद महाजनांची हत्या एक षडयंत्र, पुन्हा केस उघडा', पूनम महाजनांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

08 Nov 2024 (अपडेटेड: 08 Nov 2024, 12:00 AM)

प्रमोद महाजन यांची हत्या हा एका षडयंत्राचा भाग आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. असा गौप्यस्फोट पूनम महाजन यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना केला आहे.

पूनम महाजनांचा मोठा गौप्यस्फोट

पूनम महाजनांचा मोठा गौप्यस्फोट

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रमोद महाजन यांची हत्या हा एका षडयंत्राचा भाग असल्याचा पूनम महाजनांकडून दावा

point

गृहमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी मागणी पूनम महाजन करणार

point

मुंबई Tak चावडीवर बोलताना पूनम महाजनांचं मोठं विधान

Pramod Mahajan Murder: मुंबई: भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांचे वडील प्रमोद महाजन यांची हत्या हा एक मोठा कट होता आणि आता त्याच्या चौकशीसाठी ते राज्यातील आणि केंद्रातील गृहमंत्र्यांना पत्र लिहणार आहेत. ज्यामध्ये त्या दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. (mumbai tak chavadi poonam mahajan demands enquiry into her father pramod mahajan death after eighteen years smells conspiracy)

हे वाचलं का?

पूनम महाजन यांनी दावा केला की त्यांना प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे एका कटाचा वास येत आहे. वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या गोळीबारात काही वेगळे हेतू असू शकतात असंही त्या यावेळी म्हणाल्या.

हे ही वाचा>> Mumbai Tak Chavadi: 'उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतात का?', पाहा पूनम महाजन काय म्हणाल्या

प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत नेमकं काय म्हणाल्या पूनम महाजन?

प्रश्न: प्रमोद महाजनांची जेव्हा हत्या झाली होती त्यावेळी बराच वाद झाला होता. तुम्हीही त्यांच्या हत्येविषयीचा संशय व्यक्त केला आहे. तर त्या मागचं कारण काय? 

पूनम महाजन: मी हे गेल्या काही वर्षांपासून बोलते आहे. मी काही हे आज बोलत नाही.. कसंय.. राग कोणाचा कोणावर असणं... मी हे एका कार्यक्रमात बोलली आहे. की, त्या गोळीची आणि बंदुकीचे पैसे हे प्रमोद महाजनांचे होते. 

 

माझं मत आहे.. गोळी, हात, शरीर हे त्या माणसाचं होतं. त्याचा राग असेल त्यात कुठेतरी... पण ते कारण आणि ती बुद्धी.. ती फक्त कोणत्या तरी फालतू भांडणाची नाही. 

 

काही तरी कारण आहे.. त्याला मी राजकीय म्हटले नाही कधी. त्यामागे काही तरी मोठं कारण आहे की, ते षडयंत्र हिशोबाने दिसतं आणि हे मी दोन वर्षांपासून फार प्रखरतेने बोलतेय. 

 

मी पत्र लिहणार आहे. महाराष्ट्राचे आणि देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. हे नेमकं काय आहे ते बघा.. कारण आता मी त्या परिस्थितीत आहे. जेव्हा मी 2007-08 ला बोलत होते तेव्हा सत्ताही आपली नव्हती. तेव्हा बहुदा मला सीरियसली घेतलं नव्हतं. आज मी त्या परिस्थितीत आहे की, मी तो प्रश्न विचारू शकते. असं पूनम महाजन यावेळी म्हणाल्या.

प्रमोद महाजन यांची 22 एप्रिल 2006 रोजी मुंबईतील वरळी येथील राहत्या घरी त्यांच्या भाऊ प्रवीण महाजन याने गोळ्या झाडून हत्या केली होती. प्रवीणने चार राऊंड गोळ्या झाडल्या होत्या आणि नंतर जवळच्या पोलीस ठाण्यात त्याने आत्मसमर्पण केले होते.

हे ही वाचा>> Jayram Ramesh : फडणवीसांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर, जयराम रमेश यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेत फडणवीसांना...

30 ऑक्टोबर 2007 रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, पॅरोलवर बाहेर आलेला असताना ब्रेन हॅमरेजने त्याचा मृत्यू झाला होता.

    follow whatsapp