Vidhan Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटात राजकीय पिंगा, माजी नगरसेवक म्हणाले मलाच...

मिथिलेश गुप्ता

24 Jun 2024 (अपडेटेड: 24 Jun 2024, 02:20 PM)

मी उच्चशिक्षित आहे, मला कल्याण पश्चिम विधानसभेतून तिकीट मिळालं पाहिजे असा दावा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक श्रेयस समेळ यांनी केलाय.

शिवसेना शिंदे गटात राजकीय पिंगा

शिवसेना शिंदे गटात राजकीय पिंगा

follow google news

कल्याण : नुकतंच लोकसभा निवडणूक पार पडली आता विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाली आहे. त्या अगोदरच कल्याण पश्चिम शिवसेना शिंदे गटात विधानसभा च्या जागेसाठी रस्सीखेच सुरू झाले आहे. वर्तमान मध्ये शिवसेनेचेच कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आहेत, तरीही शिंदे गटाचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी आमदारकीवर दावा केल्याने कल्याण पश्चिममध्ये शिवसेना शिंदे गटातच राजकीय पिंगा पाहायला मिळत आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता काय भूमिका घेतात ? हे पाहावे लागेल. (shiv sena shinde group is fighting for assembly elections from now former corporator claim for mla)

हे वाचलं का?

कल्याण शहराला मी काहीतरी देणं आहे या कल्याण शहराने आम्हाला सगळं काही दिल नाव दिलं संपत्ती दिली घर दिल परिवार दिला चांगले मित्र दिले सगळेच दिले आणि त्या भावनेतून या कल्याण शहराचा विकास मुंबईला ठाण्याच्या धरतीवर व्हावा म्हणून मी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, अशी माहिती केडीएमसीचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला लोकांनी चांगले मतदान केले आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कल्याण शहराने आमच्या कुटुंबाला भरपूर काही दिले आहे. आपणही यापूर्वी नगरसेवक, सभागृह नेते पद आणि विविध समित्यांवर आपण काम केले असल्याने प्रशासनाची आपल्याला चांगली जाण आहे. त्या पार्श्वभूमीवर आता एक नागरिक म्हणून या शहराप्रती आपलीही बांधिलकी असून या शहराच्या प्रगतीसाठी - विकासासाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे श्रेयस समेळ यांनी यावेळी सांगितले.

तर आपण बी. ई. मेकॅनिकलसह एमबीए मार्केटिंगची पदवी घेतली आहे. त्यामुळे सुशिक्षीत लोकांनी राजकरणात यावे, सुशिक्षीत लोकंही राजकरणात यावीत अशी लोकांची अपेक्षा आहे. आणि पक्षाचे वरिष्ठही आपल्यासारख्या उच्चशिक्षित व्यक्तीचा उमेदवारीसाठी विचार करतील असा विश्वास समेळ यांनी यावेळी व्यक्त केला.

आपण लोकप्रतिनिधी झाल्यापासून आपल्या शेजारील ठाण्याचा विकास पाहत आहोत. या ठाणे मुंबईच्या धर्तीवर आपल्या कल्याण शहराचाही विकास व्हावा अशी आपली प्रामाणिक भावना आहे. मात्र विशेषतः प्रशासकीय कार्यकाळात ज्या वेगाने शहराचा विकास होणे अपेक्षित होते, तसा तो झालेला दिसत नाहीये. या शहराच्या विकासासाठी , समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे व्हिजन असून आपल्याला संधी दिल्यास त्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू असा विश्वास श्रेयस समेळ यांनी यावेळी व्यक्त केला. 

तर सध्याचे आमदार विश्वनाथ भोईर हे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख दावेदार असून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणे काही गैर नसून पक्ष जो आदेश देईल त्याला शिर सावंद्य मानून काम करू असेही श्रेयस समेळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

कल्याण शहराला मी काहीतरी देणं आहे या कल्याण शहराने आम्हाला सगळं काही दिल नाव दिलं संपत्ती दिली घर दिल परिवार दिला चांगले मित्र दिले सगळेच दिले आणि त्या भावनेतून या कल्याण शहराचा विकास मुंबईला ठाण्याच्या धरतीवर व्हावा ही मनापासून गेली कित्येक वर्ष इच्छा आहे आणि ही भावना लक्षात ठेवून मी आज जाहीर करतोय की कल्याण पश्चिम विधानसभा शिवसेनेकडून लढायची माझी इच्छा आहे आणि हे करत असताना शिवसेनेतून नक्कीच बरेच दावेदार असतील इच्छुक असतील प्रत्येकाने प्रत्येक जण आपले प्रयत्न करतील पण पक्ष नक्कीच एका उच्चशिक्षित संस्कार त्यांचे आहेत तीन बॅकग्राऊंड वाल्या उमेदवारालाच उमेदवारी देतील अशी माझी अपेक्षा आहे.

कल्याण पश्चिम मध्ये नाही नुसतं महाराष्ट्रात नाहीतर पूर्ण देशात लोकांची एक सतत भावना असते की सुशिक्षित लोकांनी राजकारणात यावं आणि सुशिक्षित लोकच या समाजामध्ये बदल घडवू शकतात स्वतःची तारीफ करण्यासाठी मी इकडे बसलो नाही आहे पण आज ही काळाची गरज आहे असं मला वाटतं.

आज आपण मीडियावर बघत असतो की नागरिकांची या समस्या आहेत त्या दिवसेंदिवस कमी होण्यापेक्षा वाढत चाललेल्या आहे आणि त्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होते असं मला वाटतं. कोणाचे होते का होते त्याच्यात मी जाणार नाही पण दुर्लक्ष होते असं मला वाटतं. तर या सगळ्या समस्यांना तोंड द्यायला किंवा त्यातनं सोल्युशन काढायला कोणीतरी पुढे यायला पाहिजे कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे अशी माझी भावना आहे. आणि फक्त आणि फक्त नागरिकांच्या समस्या सोडवणं नागरिकांसाठी या कल्याणच्या काहीतरी पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करून डेव्हलपमेंट करणं ही भावना घेऊनच मी आज विधानसभेच्या उतरत आहे तसं गेले 14 वर्ष मी हेच एक टारगेट ठेवलेलं की कधी ना कधी या शहराचे प्रतिनिधित्व करायला मिळावं अशी पहिल्यापासून इच्छा होती.

मी कल्याण पश्चिमच्या लोकांसाठी एक चांगला प्रतिनिधी म्हणून काम करू शकेल ओवर कॉन्फिडेंट नाहीये आपण म्हणतो तीन लाईन असते नक्कीच मी काहीतरी या कल्याणसाठी करू शकेल तसंही मगाशी म्हणालो नागरिकांची समस्या खूप आहेत नागरिक शांत आहेत हे आपण म्हणतो देणार बाय फोर्स नॉट बाय चॉईस आणि कधीतरी नागरिकांचा उद्रेक होणार त्याच्या अगोदर काही गोष्टी नियंत्रणात आलेल्या बऱ्या आणि सध्या त्या नियंत्रणाच्या पलीकडे जाताना दिसतात आणि आज एक उद्देश घेऊन पुन्हा एकदा मी आपल्यासमोर जाहीर करतो की शिवसेना पक्षातून मी कल्याण पश्चिम विधानसभा लढवण्यास इच्छुक आहे. नक्कीच वरिष्ठ एका चांगल्या उमेदवाराला तिकीट देतील सगळ्या गोष्टी ते चाचणी करतीलच प्रत्येकाच्या बॅकग्राऊंड चेक करतील प्रत्येकाचं काम चेक करतील आणि मला खात्री आहे.

    follow whatsapp