Mahayuti Maharashtra Vidhan Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जागांचे दावे केले जात आहेत. (Latest Updates about Mahayuti Vidhan Sabha seats Sharing)
ADVERTISEMENT
महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ८० ते ९० जागा मागितल्या आहेत. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने १०० जागा मागितल्या आहेत. विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. महायुतीमध्ये (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) तीन प्रमुख पक्ष आहेत. तर इतर छोटे पक्षही आहेत. त्यामुळे त्या पक्षांनाही जागा द्याव्या लागणार आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटप करण्यातच महायुतीचा सर्वाधिक वेळ गेला. त्यामुळे अनेक मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्याचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे आता ती चूक टाळण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. पण, २८८ जागांचं वाटप कसे केले जाणार हे बघणं महत्त्वाचं आहे. संपूर्ण विश्लेषण ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा...
ADVERTISEMENT