Thane Crime News : 55 वर्षीय कामगाराकडून 9 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, 7 महिन्यानंतर कारवाई, प्रकरण काय?

पोक्सो अंतर्गत कारवाई होत असून, सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:44 AM • 27 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्यामध्ये 55 वर्षीय नराधमाकडून चिमुकलीचा विनयभंग

point

7 महिन्यांपूर्वी घडली होती घटना

point

नराधमावर पोलिसांकडून पोक्सो अंतर्गत कारवाई

Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील एका 55 वर्षीय व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे. सात महिन्यांपूर्वी त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. सात महिन्यानंतर ही कारवाई का करण्यात आली, हा प्रश्न तुम्हाला पडत असेल. पण एवढा उशीर का लागला, याचं उत्तरंही जाणून घेऊ.

हे वाचलं का?

9 वर्षांची मुलगी तिच्या घराजवळील परिसरात खेळत होती. दरम्यान, शहरातील एका पॉवरलूममध्ये काम करणाऱ्या आरोपीने तिला चॉकलेटसाठी पैसे देण्याच्या बहाण्याने आमिष दाखवलं. यानंतर तो तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत विनयभंग केला. 

हे ही वाचा >> Video: 'कॉमन मॅन'साठी DCM एकनाथ शिंदेंनी अचानक ताफा थांबवला! मुंबईच्या रस्त्यावर घडलं तरी काय?

मात्र, त्यावेळी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी शनिवारी त्या व्यक्तीला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा >> Narhari Zirwal Hingoli : हिंगोलीला 'गरीब' जिल्हा का म्हणाले झिरवाळ? पुन्हा पालकमंत्रिपदावरुन नाराजीच्या चर्चा...

सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    follow whatsapp