अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतत. ते अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांचं कौतुक करताना दिसतात. आता देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की, कोव्हिड संकटात सरकार कमी पडलं आहे आणि सरकारला जबाबदार धरणं आवश्यक आहे.
ADVERTISEMENT
अनुपम खेर एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले, “आतापर्यंत हे समजून घेण्याची वेळ आली आहे की प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे. मला वाटतं की या प्रसंगी सरकारने उठून या देशातील लोकांनी ज्या गोष्टी निवडल्या आहेत त्या करणं महत्वाचं आहे. सरकारला ज्या कामासाठी निवडून देण्यात आलेले आहे ते काम सरकारने करायला हवे. देशात मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचं दिसतंय. एखादी मानवी मन नसलेली व्यक्तीच ही घटना पाहून दु:खी होणार नाही.”
अनुपम खेर पुढे म्हणाले, “काही ठिकाणी केंद्र सरकारने चूक केली आहे. त्यामुळे त्यांना यामध्ये जबाबदार धरायला हवं. मात्र, याच गोष्टीचं समोरच्या पक्षाने भांडवल करणे देखील चुकीचं आहे.” दरम्यान काही दिवसांपूर्वी अनुपम खेर यांनी एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये ‘आएगा तो मोदीही’ असं म्हटलं होतं. या ट्विटमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
दरम्यान कोरोनाविरूद्धच्या लढडाईसाठी अभिनेते अनुपम खेर यांनी देखील पुढाकार घेतला आहे. अनुपम खेर फाऊंडेशनच्या मार्फत ग्लोबल कैंसर फाउंडेशनचे डॉ आशुतोष तिवारी तसंच भारत फोर्जेचे बाबा कल्याणी यांच्यासोबत ‘प्रोजेक्ट हील इंडिया’ या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कोरोनाच्या लढाईविरोधात मदत केली जाणार असून देशातील संस्था त्याचप्रमाणे रूग्णालयांना गरजेची उपकरणं आणि साधनं पोहोचवण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT