Mazi Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ना दिवाळी बोनस मिळणार नाही, जाणून घ्या सत्य

मुंबई तक

17 Oct 2024 (अपडेटेड: 17 Oct 2024, 06:50 PM)

Mazi Ladki Bahin Yojana, Diwali Bonus : लाडक्या बहिणींना 2500 रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचे आता महिला व बालविकास मंत्री आदिती तरकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

ladki bahin yojana women will not get diwali bonus aditi tatkare office clear the speculation mukhyamantri majhi ladki bahin yojana

महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही

point

दिवाळी बोनसबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नाही

point

आदिती तटकरे यांच्या कार्यालयाने दिली माहिती

Aditi Tatakare on Diwali Bonus  : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना 2500 रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याची चर्चा सूरू आहे. काही निवडक महिलांनाच हा दिवाळी बोनस दिला जाणार आहे. यासाठी काही अटी शर्थी ठेवल्याची चर्चा होती. याबाबत अनेक माध्यमांमध्ये वृत्त देखील झळकले होते. मात्र आता दिवाळी बोनसचे हे वृत्त खोटं आहे आणि सरकारकडून अशी कोणतीही घोषणा झाली नसल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. (ladki bahin yojana women will not get diwali bonus aditi tatkare office clear the speculation mukhyamantri majhi ladki bahin yojana) 

हे वाचलं का?

खरं तर माझी लाडकी बहीण योजनेत चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रितपणे 3000 रूपये जमा करण्यात आले होते. या 3000 रूपयासंह महिलांना 2500 रूपयाचा दिवाळी बोनस मिळणार असल्याची चर्चा सूरू होती. विशेष म्हणजे काही निवडक महिलांनाच हे पैसे मिळणार असल्याचे बोलले जात होते. यासाठी काही अटी थर्ती देखील ठेवण्यात आल्या होत्या. 

जसे ज्या महिलांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत आहे. ज्या महिलांनी योजनेतून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला आहे. ज्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे. आणि या योजनेत सर्व नियम आणि अटींचं पालन केले आहे, अशा महिलांनाच 2500 रूपयाचा दिवाळी बोनस मिळणार असल्याची चर्चा सूरू होती. अनेक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले होते.त्यामुळे महिला 2500 रूपयांच्या दिवाळी बोनसची वाट पाहत होत्या. पण है पैसे कधी मिळणार आहेत? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाने हे वृत्त खोट असल्याचे सांगितले आहे. तसेच याबाबतचा कोणताही शासन निर्णय झाला नसल्याची माहिती दिली आहे. 

दिवाळी बोनस मिळणार नाही

लाडक्या बहिणींना 2500 रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचे आता महिला व बालविकास मंत्री आदिती तरकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याचे आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना दिवाळीत कोणत्याही प्रकारचा 2500 रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार नाही आहे. 

    follow whatsapp