Krishna Andhale Wanted : कृष्णा आंधळे फरार घोषित, बीड पोलिसांनी जाहीर केलं प्रसिद्धी पत्रक

31 डिसेंबरला स्वत: वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण आला. तो शरण आल्यानंतर इतर आरोपीपी अत्यंत नाट्यमयरित्या पोलिसांनी पकडले.

Mumbai Tak

मुंबई तक

22 Jan 2025 (अपडेटेड: 22 Jan 2025, 01:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कृष्णा आंधळे बीड पोलिसांकडून फरार घोषित

point

संतोष देशमुख प्रकरणात कृष्णा आंधळे आरोपी

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे पाहिजे आहे अशी प्रसिद्धी पत्रक बीडच्या पोलीस ग्रुप वरती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. या प्रकरणातले इतर आरोपी पोलिसांना सापडले, कृष्णा आंधळेला पोलीस शोधू शकलेले नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Walmik Karad : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे सुनावणी

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात हे प्रकरण तापलं, मात्र तरीही पोलिसांना अनेक दिवस या आरोपींना पकडता आलं नव्हतं. 31 डिसेंबरला स्वत: वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण आला. तो शरण आल्यानंतर इतर आरोपीपी अत्यंत नाट्यमयरित्या पोलिसांनी पकडले. मात्र, याच आरोपींच्या सोबत हा कृष्णा आंधळे होता अशी माहिती आहे. तरीही तो पोलिसांना सापडलेला नाही. विशेष म्हणजे तो आधीच एका प्रकरणात फरार होता अशीही माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी आता हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.

हे ही वाचा >>Shirdi Robbery Video : दरोडा टाकून निघालेल्या दरोडेखोरांना नागरिकांनी दगड गोटे मारून रोखलं, थरारक VIDEO

वाल्मिक कराडला मकोकामध्ये वाल्मिक कराडला याआधी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. आज ती पोलीस कोठडी संपली होती. आरोपीचे वकील अशोक कवडे कोर्टात हजर होते. तर सरकारकडून सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे कोर्टामध्ये हजर होते. तपास अधिकारी किरण पाटील यांनी तपासाची माहिती दिली. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्याची पाटलांनी माहिती दिली. पोलीस कोठडीची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार 5 फेब्रुवारीपर्यंत आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या कराड बीड पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आहे. बीड जिल्हा कारागृहात कराडची रवानगी होण्याची शक्यता आहे.


    follow whatsapp