छोटा राजन अजुनही जिवंत ! एम्सच्या डॉक्टरांनी मृत्यूची बातमी फेटाळली

मुंबई तक

• 02:18 PM • 07 May 2021

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आज दुपारी सोशल मीडियावरुन सर्वत्र पसरली. काही प्रसारमाध्यमांनीही ही बातमी चालवत एम्समध्ये उपचार घेत असलेल्या राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली. परंतू यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी राजनच्या मृत्यूची बातमी फेटाळून लावली आहे. राजन अजुनही जिवंत असून तो कोरोनावर उपचार घेतो आहे असं एम्स रुग्णालयाने कळवलं आहे. Underworld […]

Mumbaitak
follow google news

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आज दुपारी सोशल मीडियावरुन सर्वत्र पसरली. काही प्रसारमाध्यमांनीही ही बातमी चालवत एम्समध्ये उपचार घेत असलेल्या राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली. परंतू यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी राजनच्या मृत्यूची बातमी फेटाळून लावली आहे. राजन अजुनही जिवंत असून तो कोरोनावर उपचार घेतो आहे असं एम्स रुग्णालयाने कळवलं आहे.

हे वाचलं का?

६१ वर्षीय राजन दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैदेत आहे. २०१५ साली छोटा राजनला इंडोनेशियामधून भारतात आणण्यात आलं होतं. बाली येथे राजनला अटक करण्यात आली होती, त्यानंतर CBI ने त्याला भारतात आणलं. राजनविरोधात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल असुनही त्याला मुंबईत आणण्यात आलं नाही. दाऊद विरुद्ध राजन यांच्यातील गँगवॉरच्या भीतीमुळे सीबीआयने त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्येच ठेवलं होतं.

अपहरण, हत्या आणि अशा अनेक गुन्ह्यांमध्ये छोटा राजनवर देशभरात ७० गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील पत्रकार जे.डे. यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तिहार जेलमध्येच छोटा राजनवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खटला चालवण्यात येत होता. २६ एप्रिल रोजी तिहार जेलमधील एका अधिकाऱ्याने छोटा राजन आज सुनावणीसाठी येणार नाही कारण त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं.

    follow whatsapp