Kolkata Rape And Murder Case: २४ तासांसाठी OPD बंद, रुग्णांचे प्रचंड हाल; डॉक्टरांचा संप का?

मुंबई तक

17 Aug 2024 (अपडेटेड: 17 Aug 2024, 12:21 PM)

Doctors Protest Impact : कोलकाताच्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी महिला डॉक्टरच्या बलात्कार हत्या प्रकरणामुळं संपूर्ण देश हादरला आहे. गेल्या चार दिवसांपासून निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. देशभरातून या गंभीर घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून आज २४ तासांसाठी आरोग्य सेवा बंद करण्यात आली आहे.

Doctors Protest

Doctors Protest

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोलकाताच्या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद, २४ तासांसाठी आरोग्य सेवा बंद

point

मुंबईतही आरोग्य सेवा कोलमडली

point

"CBI तपासावर विश्वास ठेवला पाहिजे", केंद्रीय मंत्र्यांचं विधान

Doctors Protest Impact : कोलकाताच्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी महिला डॉक्टरच्या बलात्कार हत्या प्रकरणामुळं संपूर्ण देश हादरला आहे. गेल्या चार दिवसांपासून निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. देशभरातून या गंभीर घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून आज २४ तासांसाठी आरोग्य सेवा बंद करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या या देशव्यापी आंदोलनामुळं रुग्णसेवेला फटका बसला आहे. इंडियन मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांनी संप पुकारल्यानं आरोग्य सेवा कोलमडली आहे.

हे वाचलं का?

आयएमएने सकाळी ६ वाजल्यापासून २४ तासांसाठी सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा बंद ठेवण्याची घोषणा केलीय. वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी म्हटलंय की, अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. कॅज्युअल्टी वॉर्ड सुरु राहतील. याआधी फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशननेही (FORDA) आंदोलनाची घोषणा केली होती. 

"CBI तपासावर विश्वास ठेवला पाहिजे", केंद्रीय मंत्र्यांचं विधान

आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सीबीआयकडून (केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग) या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आपण त्यांच्या तपासावर विश्वास ठेवला पाहिजे. सीबीआयकडून योग्य पद्धतीने तपास केला जाईल. पण घटनास्थळी असलेल्या पुराव्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करु नये.

कोलकाताच्या डॉक्टरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलकर्ते विद्यार्थ्यांनी रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण केलं होतं. त्यानंतर भारतीय आरोग्य विभागाने (IMA) शनिवारी १७ ऑगस्ट सकाळी ६ ते रविवारी १८ ऑगस्टच्या सकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजेच २४ तासांसाठी काही विभागात डॉक्टरांची सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली. 

मुंबईतही आरोग्य सेवा कोलमडली

मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांच्या संघटनेनंही या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. विद्यार्थी, निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाल्यानं आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. रुग्णांच्या अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याची माहिती समोर आलीय. केईएम, नायर, सायन, कुपर रुग्णालयातील डॉक्टरांनीही संपात सहभाग घेतल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत.

अहमदाबादमध्येही डॉक्टरांकडून निदर्शने

निवासी डॉक्टरांनी अहमदाबादमध्येही या घटनेविरोधात जोरदार निदर्शने केली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून केली जात आहे.
 

    follow whatsapp