Devendra Fadnavis on Ajit Pawar : अजित पवार यांनी सांगलीमध्ये प्रचार करत असताना आर. आर. पाटलांवर आरोप केला होता. आबांनी माझा केसाने गळा कापला असा आरोप अजित पवार यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला घरी बोलवून सिंचन घोटाळा प्रकरणाची फाईल दाखवली होती असं सांगत त्यांनी आपल्यावरील आरोपांसाठी आर. आर. पाटील यांना जबाबदार धरलं होतं. दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना उत्तर दिलं होतं. तसंच गोपनियतेची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना फाईल कशी दाखवली? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती. या संपूर्ण प्रकरणावर फडणवीस झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत बोलले.
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे सरकारमध्ये राहिल्या नाही, त्यामुळे त्यांना गोपनियतेच्या शपथेबद्दल माहिती नाही. त्या ज्या फाईलबद्दल बोलत आहेत, ती फाईल सार्वजनिक आहे.थोडी माहिती घेतली असती तर त्या असं बोलल्या नसत्या. उलट अजित पवार यांची चौकशी त्यांच्या काळात सुरू झालेली आहे, यामुळे अस्वस्थ वाटलं असेल म्हणून त्यांनी असे आरोप केलेत असं फडणवीस म्हणाले. तसंच अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना ते म्हणलाे की, आर. आर. आबांना दोष देणं योग्य नाही, फाईलवर त्यांची सही होतीच, पण जो व्यक्ती आता नाही त्यांना ब्लेम का करायचं? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा >>Uddhav Thackeray : लुटेंगे और बाटेंगे... हाच भाजपचा खरा नारा, ठाकरेंचा संभाजीनगरमधून हल्लाबोल
"फाईल बघून दादा आवाक झाले होते"
अजित पवार आणि तुमच्यात नेमका काय संवाद झाला होता असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला, तेव्हा त्यांनी शब्द अन् शब्द जसाच्या तसा सांगितला. ते म्हणाले, "अजित पवार यांनी एक दिवस मला विचारलं की, देवेंद्रजी तुम्ही मला का एवढं टार्गेट करताय? तेव्हा मी म्हणालो, विषय मी उचलला, पुरावे मी दिले, पण तुमच्याच सरकारने तुमच्यावर कारवाई करायला सांगितली होती. चौकशीची परवानगी तुमच्या सरकारने दिली. त्यावेळी ते म्हणाले हे शक्यच नाही, तेव्हा मी म्हणालो बघा फाईल, तेव्हा ते फाईल बघून थक्क झाले आणि पवार साहेबांसोबतही बोलले होते."
ADVERTISEMENT