लता मंगेशकरांची प्रकृती कशी आहे?; आशा भोसलेंनी दिली माहिती

मुंबई तक

• 04:14 PM • 05 Feb 2022

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना प्रकृती बघिडल्याने शनिवारी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल त्यांची बहिणी आणि गायिका आशा भोसले यांनी माहिती दिली. आशा भोसले शनिवारी सायंकाळी लता मंगेशकर यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या. निमोनिया आणि कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर लता मंगेशकर यांना रुग्णालयातून सुट्टी […]

Mumbaitak
follow google news

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना प्रकृती बघिडल्याने शनिवारी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल त्यांची बहिणी आणि गायिका आशा भोसले यांनी माहिती दिली. आशा भोसले शनिवारी सायंकाळी लता मंगेशकर यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या.

हे वाचलं का?

निमोनिया आणि कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर लता मंगेशकर यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा त्यांना प्रकृती बघिडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या आजाराबद्दल अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र, डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कॅण्डी रुग्णालयाकडून देण्यात आली होती.

दरम्यान, सायंकाळी अचानक आशा भोसले, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक मान्यवर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात भेटीसाठी गेले. त्यामुळे लता मंगेशकरांच्या प्रकृतीबद्दल चर्चा सुरू झाली. मात्र, लता मंगेशकरांची भेट घेऊन परतताना आशा भोसले यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली.

लता मंगेशकर यांची प्रकृती आणि डॉक्टरांनी काय म्हणाले याबद्दल आशा भोसले यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘दीदींची तब्येत छान आहे. मला आशा आहे की, चांगल्या होतील. बऱ्या व्हाव्यात म्हणून आम्ही प्रार्थना करतोय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे’, अशी माहिती आशा भोसले यांनी दिली.

लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी निमोनिया झाल्याचं निदान झालं होतं. निमोनिया झाल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याचवेळी त्यांना कोरोनाचीही लक्षणं जाणवली होती. त्यामुळे चाचणी करण्यात आली. चाचणीतून कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.

औषधोपचराच्या मदतीने लता मंगेशकरांनी कोरोनावर मात केली. तब्येत सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देेण्यात आली होती. मात्र, शनिवारी अचानक लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

    follow whatsapp