राधेच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून सलमान खानने मागितली थिएटर्स मालकांची माफी

मुंबई तक

• 10:56 AM • 13 May 2021

दरवर्षी ईदच्या निमित्ताने अभिनेता सलमान खानचा एक सिनेमा रिलीज होतो. तर यावेळी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सलमान खानचा ‘राधे- युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा आज रिलीज करण्यात आलाय. सध्या कोरोनामुळे हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. याच दरम्यान, बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी सलमानने थिएटर मालकांची माफी मागितली आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सोमवारी […]

Mumbaitak
follow google news

दरवर्षी ईदच्या निमित्ताने अभिनेता सलमान खानचा एक सिनेमा रिलीज होतो. तर यावेळी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सलमान खानचा ‘राधे- युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा आज रिलीज करण्यात आलाय. सध्या कोरोनामुळे हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. याच दरम्यान, बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी सलमानने थिएटर मालकांची माफी मागितली आहे.

हे वाचलं का?

सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सोमवारी झूम कॉलच्या माध्यमातून सलमान खानने संवाद साधला होता. ज्यात त्याने आपल्या राधे या सिनेमासंदर्भात बर्‍याच गोष्टी सागितल्या होता. या दरम्यान त्याने सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगितलं की, राधे या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन शून्य होईल. त्यासाठी मला थिएटर मालकांची माफी मागायची आहे.

Radhe Review: सलमान खानच्या राधे सिनेमावर शिटी मारावीशीच वाटत नाही .

सलमान पुढे म्हणाला, “मला या सिनेमाच्या माध्यमातून नफा मिळण्याच्या आशेवर बसलेल्या थिएटर्सच्या मालकांची क्षमा मागण्याची इच्छा आहे. कोरोनाचा कठीण काळ संपेपर्यंत मी जितकं थांबू शकलो तितका मी थांबलो. ही कठीण काळ संपण्याची आम्ही याची वाट पाहत होतो जेणेकरून हा सिनेमा देशभरातील थिएटर्समध्ये रिलीज होऊ शकतो, पण तसं होऊ शकलं नाही. मला माहित नाही की सर्व काही पुन्हा पूर्ववत केव्हा होईल.”

यंदाच्या ईदला घराबाहेर जमाव करू नका; सलमान खानचं चाहत्यांना आवाहन

सलमान खानचा सिनेमा दरवर्षी बॉक्स ऑफिसवर एक नवा विक्रम नोंदवतो. दरम्यान सलमान खानचा ‘राधे’ सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा झी5, झी प्लेक्स, डिश टीव्ही, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्हीवर रिलीज करण्यात आला. Zee5 अ‍ॅपवर हा सिनेमा 12 वाजता रिलीज करण्यात आलाय. सलमान खान या सिनेमात एका एन्काऊंट स्पेशालिस्टची भूमिका साकारतो आहे.

    follow whatsapp