नागपूरमध्ये सर्व लसीकरण केंद्रांवरचा लसींचा साठा संपला, लसीकरण बंद

मुंबई तक

• 09:19 AM • 11 May 2021

नागपूरमध्ये सर्व लसीकरण केंद्रांवरचा लसींचा साठा संपला आहे. त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आलं आहे. 45 वर्षे त्यावरील वयोगटाच्या वरील व्यक्तींचं लसीकरण सोमवारपासूनच बंद झालं आहे. त्यामुळे कुठे, कुठल्या केंद्रांवर लसीकरण होतं आहे का? हे पाहण्यासाठी नागपूरकरांची वणवण सुरू आहे. 18 वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांसाठीचं लसीकरण फक्त सहा केंद्रांवर सुरू होतं. मात्र आता ही केंद्रंही […]

Mumbaitak
follow google news

नागपूरमध्ये सर्व लसीकरण केंद्रांवरचा लसींचा साठा संपला आहे. त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आलं आहे. 45 वर्षे त्यावरील वयोगटाच्या वरील व्यक्तींचं लसीकरण सोमवारपासूनच बंद झालं आहे. त्यामुळे कुठे, कुठल्या केंद्रांवर लसीकरण होतं आहे का? हे पाहण्यासाठी नागपूरकरांची वणवण सुरू आहे. 18 वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांसाठीचं लसीकरण फक्त सहा केंद्रांवर सुरू होतं. मात्र आता ही केंद्रंही बंद करण्यात आली आहेत. कारण या केंद्रांवरही लसींचा साठा आता संपला आहे.

हे वाचलं का?

लसींचा साठा कधीपर्यंत उपलब्ध होईल याची प्रशासनाकडून नेमकी माहिती नागरिकांपर्यंत देण्यात येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नागपुरात मोठा रोष प्रशासनाविरोधात आहे. लसीकरण तुटवड्याच्या संदर्भात नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांच्यासोबत मुंबई तक ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आज संध्याकाळी अथवा उद्या सकाळी लसी नागपुरात येतील त्यानंतर लसीकरण पूर्ववत सुरू होणार आहे. या संपूर्ण प्रकरणात ज्यांचा दुसरा डोस आहे अशांनी भीती व्यक्त केली आहे की जर त्यांचे वेळेत लसीकरण झाले नाही तर त्यांचा पहिला घेतलेला डोस वाया तर जाणार नाही ना.

18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबलं, याला जबाबदार कोण?

18 ते 44 गटातील लोकांसाठी लसीकरण सुरू होतं. मात्र ते आता बंद झालं आहे, सुरूवातीला लसीकरण अत्यंत व्यवस्थित पद्धतीने सुरू होतं. खासगी सेक्टरलाही त्यांनी काम दिलं होतं. पैसे देऊनही लसी घेत होते. मात्र आता खासगी किंवा सरकारी कुठेही लस उपलब्ध नाही. महाल भागातही लस उपलब्ध नाही, त्यामुळे मी आता चार ठिकाणी फिरलो मात्र अद्याप मला लस मिळालेली नाही असं एका नागपूरकराने सांगितलं. प्रशासनाने जेव्हा लसीकरण कुणाकुणाला करायचं याचं वर्गीकरण केलं त्यांचा डेटा त्यांना ठाऊक आहे मात्र तरीही लसीकरणासाठी वणवण करण्याची वेळ नागपूरकरांची वेळ येते आहेत. मी १ एप्रिलला पहिला डोस घेतलो होतो. त्यानंतर मला 2 मेला बुकिंग घेऊन आलो मात्र मला लसीचा दुसरा डोस मागच्या नऊ दिवसांमध्ये मिळालेला नाही असं एका नागपूरकराने सांगितलं. अनेकांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना अद्याप दुसरा डोस मिळालेला नाही त्यामुळे नागरिकांनी त्याबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.

    follow whatsapp