अब्दुल सत्तार हे मांडवली करण्यासाठी आले असतील, जरांगेंना पैसे देण्यासाठी आले असतील अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलीय. अब्दुल सत्तार हे भ्रष्टाचारी आणि गद्दार माणूस आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवणारे गद्दार आहेत असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी केलाय. अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटीत रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत सुमारे 3 तास चर्चा केली होती. त्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया देत मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर हल्ला चढवलाय.