बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर! राजकीय वातावरण तापलं, पाहा VIDEO

मुंबई तक

24 Sep 2024 (अपडेटेड: 24 Sep 2024, 06:53 PM)

पोलिसांनी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

follow google news

Akshay Shinde Encounter Case:  बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या चकमकीत अक्षयचा मृत्यू झाला. कारण आरोपीने पोलीस व्हॅनमध्ये असताना एक पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून गोळीबार केला, ज्यामुळे पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये त्याला मारले. या एन्काऊंटरनंतर राजकीय वातावरण तापलं असून विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. या घटनेनंतर अक्षयच्या आईने आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे टाहो फोडला आणि आरोपीचा एन्काऊंटर योग्य की अयोग्य याबाबत चर्चा चालू आहे. या घटनेने बदलापूर शहरातील वातावरण तापलं आहे आणि जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हे वाचलं का?
    follow whatsapp