ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात भरती केलं, पण उपचार सुरू करण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं होतं.
ADVERTISEMENT
अभिनेत्री नीतू कपूर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहीत ही बातमी दिली ..भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, ‘आज मी माझा छोटा भाऊ राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.’
ADVERTISEMENT