MLC Election : नागो गाणार पराभूत : भाजपनं अंग काढलं? बावनकुळे म्हणाले…

मुंबई तक

02 Feb 2023 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

MLC Election Update 2023 : नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी बाजी मारली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधूनच काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांनी तब्बल 16 हजार 700 मतं घेतली. तर दोन टर्मचे आमदार आणि भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना फक्त 8 हजार […]

follow google news

MLC Election Update 2023 :

हे वाचलं का?

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी बाजी मारली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधूनच काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांनी तब्बल 16 हजार 700 मतं घेतली. तर दोन टर्मचे आमदार आणि भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना फक्त 8 हजार 211 हजार मतं मिळाली आहेत.

मात्र यानंतर माध्यमांधी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये आमच्या चिन्हावर उमेदवार नव्हता. त्यामुळे भाजपचा पराभव म्हणता येणार नाही, असं म्हणतं या जागेवरुन अंग काढून घेतलं. (After the defeat of Nago Ganar BJP state president Chandrashekhar Bawankule made a big statement)

    follow whatsapp