ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर पक्षात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. यावेळी शरद पवार यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी एक धक्कातंत्र वापरत राजीनाम्याची घोषणा केली. मात्र, या सगळ्या घडामोडीनंतर आत्ता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खात्रीलायक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष होऊ शकतात. असं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण राजकारणाला एक नवी दिशा मिळू शकते.
Ajit Pawar Supriya Sule Sharad Pawar| Jayant Patil |NCP
ADVERTISEMENT