अजित पवारांनी बीडच्या आष्टीमध्ये मराठा आंदोलकांना भेटताच माध्यमांना कॅमेरा बंद करायला सांगितला. याशिवाय सेक्युरिटीला सांगून हे काढा बंद कॅमेऱ्याआड मराठा आंदोलकांशी चर्चा केली. अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये आल्यानंतर मराठा आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटायला आले होते. अजित पवार मराठा आंदोलकांना मराठा समाजासाठी केलेल्या कामाविषयी सांगत असतानाच कॅमेऱ्यात दृश्य कैद केलं जात असतानाच अजित पवारांनी कॅमेरे बंद करायला सांगितले.