अजित पवार यांच्या विरोधातील आंदोलनानंतर आशा बुचके रुग्णालयात दाखल

मुंबई तक

18 Aug 2024 (अपडेटेड: 18 Aug 2024, 04:37 PM)

भाजपा नेत्या आशा बुचके यांच्या आंदोलनानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्रास झाल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं.

follow google news

जुन्नर तालुक्यातील भाजपा नेत्या आशा बुचके यांना रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काळे झेंडे दाखवत आशा बुचकेंनी कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं होतं. आंदोलनावर ठाम राहिल्याने पोलिसांनी आशा बुचके आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्रास जाणवल्याने पोलिसांनी आशा बुचके यांना तातडीने रुग्णालयात नेलं. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जुन्नर येथे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला भाजपचा विरोध जाणवला. भाजपच्या आशा बुचके आणि कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत अजित पवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या. भाजपच्या आशा बुचके यांनी आरोप केला की पवारांनी मित्रपक्षांना डावललं आणि पालकत्वाची भूमिका पार पाडली नाही. जनसन्मान यात्रेत पर्यटनासह इतर विषयांवर बैठक घेतल्याने महायुतीत हा वाद निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp