राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झाले, आणि त्यांनी वाजत-गाजत बाप्पाचे स्वागत केले. या खास प्रसंगी त्यांनी साकारलेल्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये त्यांनी अनेक योजनांचे देखावे सादर केले होते, पण विशेष म्हणजे यात अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून थेट उल्लेख केला आहे. या उल्लेखामुळे खूप चर्चा निर्माण झाली आहे आणि राजकीय वर्तुळात अनेक कयास लावले जात आहेत.