उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या राजकीय आणि सामाजिक विषयांवर त्यांच्या भूमिका मांडत असतात. दरम्यान, नाशिकमध्ये ब्राह्मण समाजाच्या दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीसांनी हे विधान केलंय.
ADVERTISEMENT
नाशिक येथील कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही बुद्धिजीवी आहोत, आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्हाला याचा गर्व आहे. पण, आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही.”
पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “ही आमच्यात कमी नाहीये, पण आम्ही नाही करत. आमचं तसंच दिसून येतं. तीही आमची महानता आहे. ती तशीच दिसून येते. म्हणून आज देवेंद्र फडणवीस सीएम आहेत, न मागता. त्यांनी कधी मागितलं नाही. पण त्यांची कार्यपद्धती. त्यांची लोकसेवा हे पाहून मोदीजींनी आणि वरच्यांनी हे त्यांना बनवलं”, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलंय.
ADVERTISEMENT