नांदेडमध्ये चव्हाणांनी फडणवीसांना लगावला टोला

मुंबई तक

03 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:07 PM)

काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी शिंदे आणि श्याम सुंदर शिंदे , भास्करराव पाटील खातगावकर, माजी मंत्री सूर्यंकांता पाटील आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. स्वर्गीय गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री एकाच […]

follow google news

काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी शिंदे आणि श्याम सुंदर शिंदे , भास्करराव पाटील खातगावकर, माजी मंत्री सूर्यंकांता पाटील आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. स्वर्गीय गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र भाऊ आमचं महा विकास आघाडीचे काम उत्तम चाललंय, तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतल तर अजून उत्तम चालेय, असा टोला अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp