राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे ८ हजार ८०७ रुग्ण आढळले होते. विदर्भामध्ये तर कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढताहेत. अमरावतीमध्ये ८२१ रुग्ण आढळले होते. अशात आता अमरावतीला लागून असलेल्या वाशिम जिल्ह्यात ज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय. त्यातच आणखी चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे गेल्या 24 तासात वाशिम जिल्ह्यात तब्बल 318 नवे रुग्ण सापडले आहेत. यामधील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एकाच हॉस्टेलमधील तब्बल 190 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय 4 शिक्षकांचा देखील समावेश आहे. हे 190 विद्यार्थी वाशिम जिल्ह्यातील देगांव इथल्या एका शाळेच्या हॉस्टेलमधले आहेत. वाशिममध्ये सध्या ८४२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर १६२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याआधी वर्ध्यात हिंगणघाटमध्येसुद्धा अशीच घटना घडली होती. एकाच शाळेच्या हॉस्टेलमधील 75 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
एकाच हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना कोरोना
मुंबई तक
25 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)
राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे ८ हजार ८०७ रुग्ण आढळले होते. विदर्भामध्ये तर कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढताहेत. अमरावतीमध्ये ८२१ रुग्ण आढळले होते. अशात आता अमरावतीला लागून असलेल्या वाशिम जिल्ह्यात ज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय. त्यातच आणखी चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे गेल्या 24 तासात वाशिम जिल्ह्यात तब्बल 318 नवे रुग्ण सापडले […]
ADVERTISEMENT