बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सध्या पोलिस कोठडीत आहे. मात्र, आता अक्षय शिंदेविरोधात आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरोपी अक्षय शिंदेने त्या दोन मुलींव्यतिरिक्त आणखी एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीये. आरोपीची ओळख परेड करण्यात आली तेव्हा 'हाच तो काठीवाला दादा,' असं म्हणत दोन्हीही चिमुकल्यांनी आरोपीला ओळखलंये. बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. शाळेतीलच सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे या 24 वर्षीय तरुणाने दोघींवर स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केला. मुलींनी पालकांना सांगितल्यावर आणि त्यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणी पालकांचा संताप अनावर झाला. पालकांनी आंदोलन केलं. त्यानंतर या प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली. आता SIT ने अनेक खुलासे केले आहेत.
बदलापूर बलात्कार प्रकरण: अक्षय शिंदेची ओळख परेडमध्ये मुलींनी ओळखले
मुंबई तक
03 Sep 2024 (अपडेटेड: 03 Sep 2024, 08:11 AM)
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे विरोधात मुलींनी ओळख परेडमध्ये 'हाच तो' म्हणत ओळखले. दोन मुलींव्यतिरिक्त आणखी एका मुलीवर अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे.
ADVERTISEMENT