Badlapur News : ''त्या' चिमुरडींवर...', चौकशी समितीच्या अहवालातून खळबळजनक खुलासे

मुंबई तक

23 Aug 2024 (अपडेटेड: 23 Aug 2024, 07:57 PM)

बदलापूर प्रकरणात दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती आहे.

follow google news

Badlapur School Case Update : बदलापूर प्रकरणात एक नवीन अहवाल समोर आलाय जो आपल्या चिंतेत भर घालायला लावणारा आहे. या अहवालानुसार 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. एका मुलीने शारीरिक त्रास होत असल्याची माहिती आपल्या आजोबांना दिली. तिच्या मैत्रिणीसोबतही असाच त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांनी तपासणी केली आणि लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले.

हे वाचलं का?

या घटनेनंतर आंदोलनं झाली आणि आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. सरकारनं एसआयटी स्थापना केली आणि दोन सदस्यीय समिती गठित केली. या समितीनं सादर केलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    follow whatsapp