शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

मुंबई तक

01 Sep 2024 (अपडेटेड: 01 Sep 2024, 09:24 AM)

राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. उदयनराजे भोसले यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे.

follow google news

Chhatrapati Shivahi Maharaj Statue Collapse : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी माफी मागितली. मात्र, उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया अद्याप आली नव्हती. आता उदयनराजे भोसले यांनी पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुतळा कोसळल्याबद्दल खेद व्यक्त केला आणि याबाबत सरकारची जबाबदारी सांगितली. त्यांनी सांगितले की, या घटनेचे योग्य चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. या पुतळ्याचे महत्त्व आणि त्याचे ऐतिहासिक मूल्य लक्षात घेता, कोणत्याही सरकारी प्रकल्पात पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp