Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीत संघर्ष निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातीत मुख्यमंत्री शब्द गाळल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये एकमेकांना इशारे देण्यात येत आहेत. कॅबिनेटमध्येही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये वाद सुरु आहे. वाद मिटविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी या वादाचा मार्ग कसा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता या वादाचे पडसाद कसे उमटत आहेत याचा आढावा या व्हिडिओतून घेण्यात आलाय.