Sunil Tatkare Video: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या पक्षांमध्ये जागावाटपासाठी संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने १५० ते १६० जागा लढण्याची तयारी सुरू केली असून शिवसेना ८० जागांसाठी आग्रही आहे. परंतु यामध्ये राष्ट्रवादीची काय स्थिती आहे आणि पक्षाला किती जागा मिळणार यावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की राष्ट्रवादीला अधिक जागा मिळण्यासाठी चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीच्या यशासाठी तिन्ही पक्षांचे एकत्र येणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.