Maratha Reservation : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मात्र, त्यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजास आरक्षणाची मागणी केल्याने ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात तणाव वाढला आहे.