हि घटना आहे पनवेल शहराच्या मणीकनगर सोसायटीतील. ४४ वर्षांच्या प्रिया नाईक आपल्या कुटुंबासोबत फ्लॅटमध्ये राहत होत्या. १३ सप्टेंबरला प्रीया नाईकचे पती प्रल्हाद नाईक संध्याकाळी घरी आले असता त्यांना प्रिया नाईक रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या. नाकातून आणि तोंडातून रक्त येत होते आणि गळ्यावर व्रण होते. प्रल्हाद नाईक यांनी त्वरित त्यांना पनवेलच्या सहस्त्रबुद्धे रुग्णालयात दाखल केले. पोलिस तपासात उघड झाले की, सख्ख्या मुलीनेच आईला मारण्याची सुपारी दिली आणि ती भावाला दिली. हा हत्येचा थरार आणि गुढ उलगडण्याचा प्रयत्न पनवेल पोलिसांचे तपासातून होत आहे.