मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेली गाडी आणि त्यानंतर या गाडी मालकाचा ठाण्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह यावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ठाण्यात राहणाऱ्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह आज सापडला. त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी काल रात्री पतीला क्राईम ब्रांचमधून एक फोन आला होता असा आरोप केला आहे. मुंब्राच्या खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या तोंडावर रुमालांचा गठ्ठा आढळून आला. प्रत्यक्षदर्शींच्या मते हे रुमाल त्यांच्या तोंडात कोंबलेले होते. दरम्यान अँटिलिया प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर भाजपने आरोप केले आहेत.
मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि रुमालांचे गूढ
मुंबई तक
05 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेली गाडी आणि त्यानंतर या गाडी मालकाचा ठाण्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह यावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ठाण्यात राहणाऱ्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह आज सापडला. त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी काल रात्री पतीला क्राईम ब्रांचमधून एक फोन आला होता असा आरोप केला आहे. मुंब्राच्या खाडीत हिरेन यांचा […]
ADVERTISEMENT