एक असा नेता जो कधी आमदार झाला नाही, ना खासदार. पण सत्ता राबवणाऱ्यांत, सत्ताधाऱ्यांत प्रचंड दरारा. अव्वल दर्जाचा राजकारणी, पण राजकारणात आला नसता तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असता. कोल्हापूर संस्थानचा कारभार जनतेच्या हातात यावा, संस्थानचा कारभार जनतेला उत्तरदायी हवा यासाठी तुरुंगवास भोगणारा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या हयातीतच कोल्हापुरात जगातला पहिला पुतळा उभारला. आयुष्यभर तत्वानं जगणारा. पण जेव्हा घरातच तत्त्वाची माती होतेय, हे लक्षात आलं, तेव्हा घर सोडून सरकारी गेस्ट हाऊसमध्ये हयात घालणारा हा नेता म्हणजे भाई माधवराव बागल. करवीरच्या इतिहासात भाईंचा उल्लेख कोल्हापूरचा अनभिषिक्त राजा अशा शब्दांत केला जातो. आज आपण अस्सल मराठे या आपल्या विशेष शोमध्ये 5 किस्स्यांतून भाईंच्या व्यक्तीमत्त्वावर प्रकाश टाकणार आहोत. भाई माधवराव बागल कोण होते, कोल्हापूर संस्थानाला त्यांचा विरोध का होता. हयातीतच डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा का उभारला, तेच या व्हिडिओत बघणार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा कोल्हापुरात उभारला गेला, काय त्याचा किस्सा?
मुंबई तक
06 Dec 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)
एक असा नेता जो कधी आमदार झाला नाही, ना खासदार. पण सत्ता राबवणाऱ्यांत, सत्ताधाऱ्यांत प्रचंड दरारा. अव्वल दर्जाचा राजकारणी, पण राजकारणात आला नसता तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असता. कोल्हापूर संस्थानचा कारभार जनतेच्या हातात यावा, संस्थानचा कारभार जनतेला उत्तरदायी हवा यासाठी तुरुंगवास भोगणारा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या हयातीतच कोल्हापुरात जगातला पहिला पुतळा उभारला. […]
ADVERTISEMENT