ADVERTISEMENT
खासदार श्रीकांत शिंदे व आमदार संजय शिरसाट यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत थुंकले होते. संजय राऊत यांच्या कृत्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राऊत यांच्या पोस्टरला जोडे मार आंदोलन केलं तसेच पोस्टरवर पान खाऊन पिचकारी मारत संजय राऊत यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवला..
Eknath Shinde Shiv sena protest against sanjay raut
ADVERTISEMENT