महायुती सरकारने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 9 दिवसातच 484 शासन निर्णय जारी केलेत. यातले 370 शासकीय निर्णय हे फक्त 4 दिवसात म्हणजे 4, 5, 6, 9 सप्टेंबरला काढले गेले. यातील विशेष म्हणजे सप्टेंबर 4 आणि 5 तारखेला प्रतिदिन 118 जीआर काढण्यात आले. गेल्या दोन महिन्यांमध्ये जीआर काढण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि हे विशेषकरून विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर झाले आहे. यावरून स्पष्ट होते की, सरकारची निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. आगामी दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका होऊ शकतात आणि त्याच्या आधीची ही घाई सरकार करत आहे. नेमकी ही घाई का केली जात आहे? जाणून घ्या INSIDE STORY.