हरियाणात भाजपचा विजय: काँग्रेसची चूक काय? पाहा VIDEO

मुंबई तक

09 Oct 2024 (अपडेटेड: 09 Oct 2024, 05:59 PM)

हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली, काँग्रेसने कोणती चूक केली?

follow google news

Haryana Assembly Election 2024 :  हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आहेत, आणि या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने (भाजप) एकहाती सत्ता मिळवली आहे. हरियाणात भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक नाही, तरीसुद्धा भाजपने विजय मिळवला आहे. या विजयानंतर काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज आहे. हार मान्य करतांना काँग्रेसकडून काय चुकलं असावं, यावर चर्चा होतेय. भाजपने आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर, मतदारांशी थेट संवाद साधून, चांगल्या प्रचार मोहिमेच्या जोरावर हा विजय संपादन केला आहे. यावेळी काँग्रेसला निस्तेज प्रचारकार्य, एकमताचा अभाव, प्रभावी नेते मंडळींची अनुपस्थिती यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. हरियाणातील राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी, नेतेमंडळींना आतापासूनच तयारीला लागून पुढील निवडणुकीसाठी आपल्या रणनीतीत बदल करण्याची गरज आहे. भाजपच्या विजयाने ही निवडणूक धडा दिला आहे की, कितीही कठीण परिस्थिती असली तरी निर्णय घटना, योजना, आणि संघटन या त्रिसुत्रीच्या आधारे घेता येतो.

हे वाचलं का?
    follow whatsapp